खारेपाटण पूलावरील वाहतुक अखेर सुरू.;पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर..

खारेपाटण पूलावरील वाहतुक अखेर सुरू.;पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर..

कणकवली /-

पावसाने धुमाकूळ घालत दळणवळणाचे सारे मार्ग बंद केल्यानंतर काल सायंकाळपासून थोडी विश्रांती घेतली .आज सकाळ पासून पावसाचा जोर ओसरल्यावर खारेपाटण शुकनदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने खारेपाटण ब्रिटीश कालीन पुलावरील वाहतूक ही सुरू करण्यात आली आहे गेले पाच ते सहा दिवस सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने खारेपाटण येथील शुकनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असल्याने खबरदरीचा उपाय म्हणून खारेपाटण मुबई – गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल अवजड तसेच सर्वच वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.यामुळे मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खारेपाटण येथील पूरपरिस्थिती लक्षात घेता तसेंच शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडल्या मुळे सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग उपविभाग कार्यलाय खारेपाटणच्या वतीने पोलिस प्रशासनाला लेखी पत्र पाठवून वाहतूक महामार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत सुचवा देण्यात आल्या होत्या. तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा कार्यकारी अभियंता तसेच म्हसुल प्रशासन यांना देखील कळविण्यात आले होते.खारेपाटण पुराच्या पाण्याने शुकनदीवरील ब्रिटिशकालीन पुलाने ९.५ मिटर उंचीची पातळी गाठली होती. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी व पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण येथे सुमारे दीड किलोमीटर पर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मात्र आता खारेपाटण शुकनदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने या मार्गावरील-पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..