जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंतांच्या विरोधात “पोस्ट व्हायरल” करून भाजप करत आहे घाणेरडे राजकारण.;शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडतेचा आरोप..

जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंतांच्या विरोधात “पोस्ट व्हायरल” करून भाजप करत आहे घाणेरडे राजकारण.;शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडतेचा आरोप..

कुडाळ /-

सहकारातील बडा नेता भाजपात जाणार,अशी शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल करून आमदार नितेश राणे आणि त्यांचे लाचार कार्यकर्ते घाणेरडे राजकारण करत आहेत,अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे केली.दरम्यान सावंत यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.आरोप करण्यासारखे काहीच नसल्यामुळे त्यांना खालच्या पातळीवर राजकारण करावे लागत आहे,असेही ते यावेळी म्हणाले.याबाबत श्री. पडते यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की त्यात असे म्हटले आहे की, शिवसेनेतील लहान-मोठ्या नेतृत्वाचा व कार्यकर्त्यांचा सतीश सावंत यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सतीश सावंत यांची लोकप्रियता ही संयमी नेता अशी आहे. तर विरोधक नेतृत्वाची लोकप्रियता राडेबाज नेतृत्व अशी आहे. विरोधकांनी फक्त हात-पाय तोडण्याची भाषा केली आहे. तर सतीश सावंतानी गोरगरीब जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. हे जनता जाणते. आज सतीश सावंत यांनी जि. प. अध्यक्ष, जि. प गटनेता व सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष म्हणून जे काही काम केले आहे ते आपल्यासमोर आहे. सिंधुदुर्गातील राजकारण असो अथवा सहकार असो त्यात यापूर्वीच्या महान नेत्यांनी आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली, परंतु खालच्या पातळीवरचे राजकारण केले नाही. पण गेल्या दहा वर्षात केवळ वारसाहक्काने झालेले नेते सर्व पातळी सोडून राजकारण करीत आहेत ही बाब अत्यंत खेदजनक आहे व सिँधुदुर्गच्या विकासाला मारक आहे.

अभिप्राय द्या..