तात्काळ दुरुस्तीसाठी वागदे सरपंच घाडीगावकर यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष..
कणकवली /-
कणकवली तालुक्यात काल भयंकर अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. तालुक्यातील वागदे कसवण – तळवडे जाणाऱ्या रस्त्यालाही या अतिवृष्टीची झळ पोहोचली आहे. रस्ता एक ते दोन फूट पूर्णपणे खचून गेल्याने वाहतुकीसही धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. रस्त्याला सगळीकडे भेगा पडल्या आहेत.
यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, यासाठी कणकवली तहसिलदार तसेच सार्व. बांधकाम विभागाकडे वागदे सरपंच घाडीगावकर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले असून यावर लवकरात लवकर कार्यवाही करून रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी वागदे ग्रामपंचायतीमार्फत तसेच ग्रामस्थांमार्फत करण्यात आली आहे.
