You are currently viewing मुसळधार पावसाने वागदे-आंब्रड रस्ता खचला;वाहतूक झाली ठप्प..

मुसळधार पावसाने वागदे-आंब्रड रस्ता खचला;वाहतूक झाली ठप्प..

​​कणकवली /-

मुसळधार पावसाचा फटका कणकवली तालुक्याला बसला असून रविवारी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्‍यातील काही भागांमध्ये झालेले नुकसान आता पुढे येऊ लागले आहे. कणकवली तालुक्यातील वागदे​-कसवण​-आंब्रड जाणारा रस्ता खचला असून रस्त्याचा काही भाग जवळपास एक ते दीड फूट खचल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वागदे मांगरवाडी येथे हा रस्ता खचल्याने मोटरसायकल वगळून या मार्गावरील अन्य वाहतुक ठप्प झाली आहे. दोन वर्षापूर्वी येथील रस्त्याचा काही भाग खचला होता. मात्र त्यावेळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता रस्त्याचा सुमारे वीस ते पंचवीस मीटरचा भाग एक ते दीड फूटाने खचला असून, याबाबत तात्काळ कार्यवाहीची मागणी वागदे ग्रामपंचायत उपसरपंच रुपेश आमडोसकर यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..