कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेली महिला घरी परतलीच नाही..

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेली महिला घरी परतलीच नाही..

वैभववाडी/-

कपडे धुण्यासाठी नदीवर जाते असे नातेवाईकांना सांगून गेले ली महिला घरी आली नाही म्हणून तिच्या भावाने वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.बेपत्ता महिलेचे नाव अर्पणा अनिल पाडावे वय 35 रा.नाधवडे ब्राह्मणदेववाडी असे आहे.ही घटना 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.बेपत्ता महिला ही मूळ सोनाळी येथील रहिवासी आहे.गेले काही महिने बेपत्ता महिला व तिच्या पतीमध्ये भांडणे होत होती.त्यामुळे ती आपल्या माहेरी नाधवडे येथे आई वाडीलांकडे होती राहत होती.मंगळवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेली ती पुन्हा घरी आली नाही.नातेवाईकांकडे शोधाशोध करूनही सापडली नाही म्हणून तिचा भाऊ गुरूप्रसाद चंद्रकांत मुद्रस यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.अधिक तपास पोलीस नाईक गिरीष तळेकर करीत आहे.

अभिप्राय द्या..