नवी दिल्ली /-
▪️ कोरोनामुळे खासदारांच्या पगारात 30 टक्क्यांनी कपात होणार आहे. त्यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक काल संसदेत मंजूर करण्यात आले. खासदारांच्या पगारामध्ये एका वर्षासाठी 30 टक्के कपात करण्याची तरतूद असलेलं विधेयकात सरकारने लोकसभेत सादर केलं ते विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले.
▪️कोरोना व्हायरसच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान खासदारांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये (CIF) जमा करण्यात येणार आहे.
*वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका…*
खासदारांचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे.