राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली; 5 जणांचा मृत्यू..

राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली; 5 जणांचा मृत्यू..

राजस्थानच /-

राजस्थानच्या बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये बोट बुडून अपघात झाला आहे. या बोटमध्ये 25 ते 30 प्रवास करत होते.या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 10 जण बेपत्ता आहेत.

राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

अभिप्राय द्या..