आरोंदा रेडझोन जि.प.सदस्या शर्व|णी गावकर केव्हीड योध्या.!

आरोंदा रेडझोन जि.प.सदस्या शर्व|णी गावकर केव्हीड योध्या.!

सावंतवाडी /-

आरोदा पंचक्रोशीत कोरोना रुग्ण आढळल्याने संपुर्ण बाजारपेठेत व तीन रेड झोन ऐरीयात निर्जंतुकीकरण करण्याचे आयोजन जि.प.सदस्या शर्वरी गावकर यानी केले.यासाठी संजु विरनोडकर यांच्याशी संपर्क करुन हि कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. नाॅन ब्लिचींग फवारणी करताना शर्वरी गावकर यानी काही ठिकाणी स्र्पे गन व्दारे स्वतः फवारणी करुन समाजासाठी धाडसी कार्य केले. कोरोना विरुध्द लढाईत महिला देखिल जिवाची बाजी लावू शकतीत असा आदर्श निर्माण केला व फवारणी दरम्यान होणार्‍या त्रासाची पर्वा केली नाही. संजु विर्नोडकर व नागरीकानीही त्यांच कौतुक केले. रेड झोन असणार्‍या शिपीती वाडा,मानशीवाडी,बाजारवाडी, या तीन भागात कोरोना बाधित घरात व लगतच्या शंभर मिटर घरात व परिसरात कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्यात आली.

आरोंदा चेकपोस्ट, पोलिस चौकी,ग्रांमपंचायत आँफीस,तलाठी आँफिस,दवाखाने,मंदिर,सोसायटी,हाॅटेल,सुपर मार्केट, सिंधुदूर्गबॅक,ATM,एस्टी स्टँड,कॅटींग,मच्छी मार्केट,हाॅटेल,मुख्य बाजारपेठ व अंतर्गत रस्ते याठिकाणी बॅंन्झाक्युलम क्लोराईट या ईकोफ्रेंडली प्रभावी सोलुशन ने प्रेशर पंप मशिनव्दारे फवारणी करण्यात आली. या उपक्रमात ग्रांमपचायत सदस्स देखिल सहभागी झाले. ग्रां.सदस्य श्री. अनंत सातोस्कर,उमेश तानावडे,जाॅनी फर्नांडिस,आत्माराम आचरेकर,सहदेव साळगावकर,शुभमनाईक सिध्दार्थ तानावडे व टिंमचे आकाश मराठे पुर्ण फवारणी दरम्यान व रेडझोनच्या ठिकाणी जातीनीशी शेवटपर्यंत सहभागी सहभागी होवून मोलाचे सत्कार्य केले. संजु विर्नोडकर टीमच्या कामगिरीला आरोंदा वासियानी दाद दिलीच पण दिवसभर राबवलेल्या या उपक्रमाबद्दल आभार मानले. जिल्हा परिषद सदस्या शर्वरी गावकर याना धन्यवाद दिले..

अभिप्राय द्या..