कणकवली बाजारपेठ उद्यापासून दोन दिवस पूर्णता बंद!फक्त अत्यावश्यक सेवेतील मेडिकल,दवाखाने राहणार चालू!

कणकवली बाजारपेठ उद्यापासून दोन दिवस पूर्णता बंद!फक्त अत्यावश्यक सेवेतील मेडिकल,दवाखाने राहणार चालू!

न.पं.चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली माहिती

कणकवली /

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंधांमधून काहीशी सवलत देण्यात आली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याला चौथ्या टप्प्यातील नियम लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार हे दोन दिवस कणकवली शहरातील मेडिकल वगळता अन्य सर्व दुकाने पूर्णतः बंद राहणार आहेत. या कालावधीत अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. त्याचाच भाग म्हणून कणकवली शहरातील मेडिकल दुकाने वगळून अन्य अत्यावश्यक सेवेत असलेली देखील सर्वच दुकाने उद्या शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्णता बंद राहणार आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिली. तसेच तावडेंनी कणकवलीतील व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवकर, उपाध्यक्ष राजन पारकर, शेखर गणपत्ये यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा केली असून व्यापारी व नागरिकांनी शनिवार व रविवार दोन दिवस शहरातील मेडिकल वगळून अन्य सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवावित, असे आवाहन तावडे यांनी केले आहे. या संदर्भात आज शहरात लाऊड स्पीकर च्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात येत असल्याची माहिती, तावडे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..