कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील पावशी गावात उद्यापासून म्हणजे बुधवारी ०९ जूनपासून कडक लॉकडाऊनकरण्यात आले आहे.त्यासाठी पावशी गावातील कोरोना गाव समितीकडून आणि पावशी सरपंच बाळा कोरगावकर उपसरपंच दीपक आंगणे यांनी कडक लॉकडाऊनचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.कोरोना थांबवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, आर्थिक मदत ,वस्तू स्वरुपातील मदत देण्यासाठी दानशूर वेक्तिंना आव्हाहन करण्यात आले आहे. जेणे करून पावशी गावातून कॉरोना मुक्ती मिळवून पावशी गाव कोरोना मुक्त करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.तसेच गावात कोरोना सदुर्ष पेशनट मिळू नये याकरिताच ही गाव बंद ची हाक ०९ जून ते १३जून पर्यत कोरोना कृती समितीने घेतली आहे.गावात नाक्यावर फिरणारे ग्रामस्थ किंवा कामाव्यतिरक्त फिरणारा आळा आणण्यासाठी दंडात्मकत कारवाई करण्यात येईल असे निर्णय घेण्यात आले व कोरोना मुक्तच्या दिशेने पावशी गावाची वाटचल व्हावी यासाठी हे ०९ ते १३ जून या कालावधीत लॉकडाऊन करण्यात आले आहे.