वेंगुर्ले /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे २०२१ रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला सात वर्षे पुर्ण करीत आहेत.त्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा करण्यात येत आहे.वेंगुर्ले तालुक्यामध्ये विविध सेवा कार्य हाती घेऊन सत्पवर्षपुर्ती उत्साहात साजरी करण्यात आली.या सेवा सप्ताहाचा शुभारंभ आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन करण्यात आला.समाजातील एक घटक गवळी. हा गवळी काबाडकष्ट करून गुरांचे पालन – पोषण करीत असतो. गुरांसाठी लागणारे वैरण हे गोठ्याच्या बाजुला एका मांगरात किंवा बाहेर माच करुन ठेवलेले असते.परंतु पावसामध्ये गुरांसाठी ठेवलेले वैरण भिजून खराब होते व ओले झालेले वैरण गुरेही खात नाहीत.ही अडचण लक्षात घेऊन गुरांचे वैरण भिजू नये म्हणून “सामाजिक भावनेतून” गवळयांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील कॅम्प – गवळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण व न.प.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक,नगरसेवक धर्मराज कांबळी,नगरसेविका श्रेया मयेकर,अल्पसंख्याक आघाडीचे रफिक शेख,युवा मोर्चाचे संदीप पाटील, बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण,महिला सरचिटणीस वृंदा गवंडळकर,राधा सावंत,शैलेश मयेकर,पुंडलिक हळदणकर,रामदास मंबाईल,अशोक जगताप,गजानन जगताप आदी उपस्थित होते.यावेळी गवळी समाजाचे दिगंबर जगताप,पिंटू जगताप,प्रसाद बावीसकर, दिनेश गवळी,कांता भैरट,मैनु धारवाडकर,संतोष गावडे, पांडुरंग मराठे तसेच हाॅटेल
व्यावसायिक विजु खानोलकर , राजश्री खानोलकर यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.