कुडाळ /-

सध्या मालवण मध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या परिवार साठी ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम जोरात सुरू असून कुडाळ एसटी स्टॅन्ड कडे संपूर्ण दुर्लक्ष झालेला आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळी काळात एसटी स्टँड ची अवस्था अत्यंत दयनीय होणार असून  गावागावातून येणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत.
सदर एसटी स्टँड बांधताना स्थानिक आमदारांनी खूप प्रयत्न केले पण आता सदर स्टॅन्ड ची अवस्था अशी झाली आहे की शर्ट घातले पण पॅन्ट नाही. त्यामुळे सर्व उघडे पाडले आहे, होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यात एसटी प्रशासनाने तसेच आमदार साहेबांनी लवकरात लवकर लक्ष घालून शेड पावसाळ्याच्या अगोदर बांधावी.
सध्या एसटी महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे सर्व कामे अर्धवट पडलेली आहेत आणि भविष्यात लवकर ती कामे होतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे होणार. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची स्थानिक आमदारांना अशी विनंती राहील की आपण उरलेले काम आपल्या आमदार निधीतून पूर्ण करावे आणि जनतेचे आशीर्वाद घ्यावेत. असे  महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page