कुडाळ /-
आज मनसे चे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ मालवण विधानसभा तर्फे मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मार्फत मनसे सरचिटणीस व कामगार सेना अध्यक्ष डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभारमाठ येथील आरोग्य केंद्रास करोना सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णां करिता लागणारी औषधे तसेच फेस शिल्ड मास्क व फेस मास्क देण्यात आले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब मातोश्री ट्रस्टतर्फे संदीप परब सचिन रणदिवे महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष श्री. बनी नाडकर्णी, श्री. पास्कोल रॉड्रिग्ज, मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष, देवबाग विभाग प्रमुख श्री. अल्बर्ट रॉड्रिग्ज, महाराष्ट्र सैनिक श्री. घाब्राईल रॉड्रिग्ज आणि लोरेन्स रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.
या साठी जिल्हाध्यक्ष धिरज परब यांचे मार्गदर्शनाखाली पास्कल रॉड्रिग्स यांनी विशेष मेहनत घेतली.