वेंगुर्ला /-


कोरोना काळामध्ये शिरोडा सरपंचांनी नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.
सरपंचांनी लवकरच हा अन्याय थांबवावा व सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही दिवसांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करणे थांबवावे. त्यांनी लवकरच नळ कनेक्शन चालू करून द्यावी, अन्यथा आम्ही ग्रामपंचायत विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशारा वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश ऊर्फ भाई परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि,कोरोना महामारीचे संकट असताना आज सर्व ठिकाणी शासनाकडून जनता कर्फ्यू लागू केलेले आहे. तसेच १४४ कलम देखील लागू केलेले आहे. याचाच अर्थ असा
कि नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी परिस्थिती असताना शिरोडा सारख्या ठिकाणी दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई भासत असते. खास करून गांधीनगर व केरवाडी यासारख्या भागांमध्ये कधीतरी टँकरने देखील पाणी पुरवले जाते. सद्यस्थितीत गावामध्ये जिथे-तिथे कंटेनमेंट झोन आहेत, अशा कठिण परिस्थितीमध्ये शिरोडा ग्रामपंचायत कडून नळकनेक्शन तोडण्याचे काम चालू आहे. कारण नागरिकांकडून पाणीपट्टी भरलेली नाही, असे असताना नागरिकांनी सरपंचांना विनंती करत पाणीपट्टी भरण्याची काही दिवसांची मुदत मागितली. परंतु विनंती करुन देखील अशाप्रकारचे नळ कनेक्शन तोडून सरपंचाकडून नागरिकांवर झालेला अन्याय आहे.सरपंचांनी लवकरच हा अन्याय थांबवावा व सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही दिवसांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करणे थांबवावे. त्यांनी लवकरच नळ कनेक्शन चालू करून द्यावी, अन्यथा आम्ही ग्रामपंचायत विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशारा उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.सरपंचांनी नागरिकांवर थोडी तरी माणुसकी दाखवावी,असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page