कणकवली /-
कणकवली शहरातील गडनदी पात्रातील मधील माऊलींची कोंड येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळीच या परिसरात गेलेल्या एका व्यक्तीला पाण्यावर तरंगताना अनोळखी व्यक्ती दिसताच त्यांनी याची माहिती रेल्वे स्टेशनवर असलेले रिक्षाचालक संजय मालंडकर व संतोष सावंत यांना दिली. त्यांनी तात्काळ कणकवली पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी असलेले उपस्थित नागरिक व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे.