उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर तर सचिव पदी मिलिंद धुरी जिल्हाध्यक्ष,जिल्हाउपाध्यक्ष यांच्या उपस्थित माणगाव येथे निवड संपन्न..
कुडाळ/-
महाराष्ट्र राज्य मराठी कुडाळ तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कुडाळ तालुका अध्यक्षपदी श्री.कृष्णा सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी मिलिंद धुरी, खजिनदार पदी इब्राहिम खुंल्ली, तर सदस्य म्हणून अमिता मठकर,विश्राम वारंग यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कुडाळ तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष समिल जळवी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय भाईप उपस्थित होते.