पिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी.;कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी.;कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कुडाळ /-

पिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी दोन्ही गटातील व्यक्तींनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून एकूण आठ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वा च्या सुमारास घडली.

यामध्ये मुनाफ कासम खुल्ली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आफरोज शरफुद्दीन खुल्ली, आशपाक शरफुद्दीन खुल्ली, अमजद शरफुद्दीन खुल्ली, आलताफ शरफुद्दीन खुल्ली यांनी एकमेकांच्या संगनमताने आपल्याला मारण्याच्या ऊद्दैशाने हातात कोयता व लोखंडी राँड घेऊन येऊन मला शिवीगाळ करून हातावर लोखंडी राँडने व डोकीवर कोयत्याने मारून गंभीर दुखापत करून ठार मारण्याची धमकी दिली. यात मुनाफ खुल्ली घरी येत असताना आफरोज याने आपल्याला हाक मारली व आपल्या घरी बोलावून घेतले व अन्वर शाफिक खुल्ली याला घर बांधायला जागा कुठे आहे असे विचारले. यावर मुनाफ यांनी त्याच्या वडिलांना माझ्या वडिलांना जागा दिली आहे त्याचे वडील काय ते पाहतील यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली यानंतर या चारही जणांनी आपल्याला कोयता लोखंडी राँडने माराहाण केली अशी तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात दिली आहे यावरून आफरोज शरफुद्दीन खुल्ली, आशपाक शरफुद्दीन खुल्ली, अमजद शरफुद्दीन खुल्ली, आलताफ शरफुद्दीन खुल्ली यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आशपाक शर्फु खुल्ली याने दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी घराजवळ असताना चुलतभाऊ मुनाफ कासम खुल्ली याला मुंबई येथे राहणारा भाऊ अन्वर शफी खुल्ली याला आपल्या घराच्या बाजूला पिंगुळी गोंधळाये येथे घर बांधायचे आहे यासाठी तू व मी परवानगी देऊया असे सांगितले याचा त्याला राग आला व शिवीगाळ करून तू सांगणार कोण घर बांधणीची परवानगी देण्याचा तुला अधिकार कोणी दिला? असे बोलून घरी जाऊन ४.३० वा. भाऊ आसलम कासम खुल्ली आपला भाचा जैमुद्दीन आबु खुल्ली उर्फ शाहिर व आपला मुलगा करिम मुनाफ खुल्ली यांना घेऊन येऊन शिवीगाळ केली.यापैकी आसलम कासम खुल्ली याने आपल्या हातात असलेल्या दांड्याने फटका उजव्या खांद्यावर मारून दुखापत केली . जैमुद्दीन आबु खुल्ली याने आपल्या हातात असलेला दांडा कपाळावर मारून दुखापत केली. तसेच मुनाफ कासम खुल्ली दांडा पाठीवर मारून दुखापत केली व घराच्या खिडकीच्या दोन काचा व दोन खुर्ची तोडून नुकसान केले. याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

अभिप्राय द्या..