वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सौ.अनुश्री कांबळी यांचे ते वडील होत..

वेंगुर्ला /-

तुळस खरीवाडी येथील गावचे सुपुत्र,निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू उर्फ दाजी परुळकर (६८वर्षे) यांचं आज दि. ०८ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली,त्यांनी अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवले,त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आदर्श शिक्षक पुरस्कार ही प्राप्त झाला होता,त्या काळात उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून ते परिचित होते.अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता,५० पेक्षा जास्त सामाजिक नाटकात त्यांनी काम करून नाट्य देवतेची सेवा केली.वेताळ नाट्यमंडळ तुळस आणि शिवशक्ती नाट्यमंडळ,होडावडे या दोनी नाट्यमंडळांना नावारूपाला आणण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता.वेताळ प्रतिष्ठानच्या सर्वच उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे,

पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी आणि प्रसाद परुळकर यांचे ते वडील तर बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.सचिन परुळकर यांचे ते काका होत,त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,मुली,नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page