कुडाळ /-
कुडाळचे मुख्याधिकारी नितीन दशरथ गाढवे यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुडाळ केळबाई वार्ड क्रमांक १० चे नगरसेवक गणेश भोगटे यांना ५ मे २०२१ पर्यंत न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
काल २२ एप्रिल रोजी नगरसेवक गणेश भोगटे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन गाढवे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. प्रकरण हातघाईवर आले होते. गाढवे यांनी पोलीसात भोगटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याप्रमाणे सरकारी कामात हस्तक्षेप करुन जीव मारण्याची धमकी दिल्याने भोगटे यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.