कुडाळ /-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका संघटनेची मासिक बैठक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे अध्यक्षतेखाली कुडाळ एमआयडीसी येथे पार पडली. सदर बैठकीस पक्ष संघटनात्मक बांधणी व विस्ताराबाबत सखोल चर्चा होऊन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सदस्य नोंदणी अभियान सप्ताह राबवण्याचे ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने रविवार दिनांक 21 मार्च 2021 रोजी ओरोस आठवडा बाजार येथून नोंदणी अभियानास सुरुवात होऊन सोमवार 22 मार्च पणदूरतिठा,मंगळवार 23 मार्च माणगाव,बुधवार 24 मार्च कुडाळ,गुरुवार 25 मार्च कसाल,शुक्रवार 26 मार्च कडावल आणि 27 मार्च पिंगुळी असे नियोजन करण्यात आलेले असून पाट,आंब्रड,नेरूर घोडगे आदी ठिकाणी होळी सणानंतर नियोजन करून जास्तीत जास्त नोंदणी अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे ध्येय उराशी बाळगून सदैव महाराष्ट्र हिताचा विचार करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचे सद्स्यत्व स्वीकारून नवोदित तरुण तरुणींनी येत्या काळात नव्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन मनसेच्या वतीने कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.