सिंधुदुर्ग /-
मुंबई – गोवा महामार्गावरील ओरोस क्रिश्चन वाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘ सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपेल’ चे उद घाटन गोव्याचे आर्चबिशप फेलिक्स फर्नांडीस यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या थाटात पार पडले.यावेळी सिंधुदुर्गचे आर्चबिशप ऑलविन बरेटो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर ‘ चॅपेल ‘ चे फीत कापून उदघाटन करण्यात आले .त्यानंतर विधीवत प्रार्थना करण्यात आली.हायवे दुपदरीकरणामुळे जुने ‘ चॅपेल ‘ पाडावे लागले.परिणामी स्थानिक क्रिश्चन समाजाला प्रार्थना करण्यात अडचणी येत होत्या.अखेर गेल्या वर्षभरात जुने ‘ चॅपेल ‘ पाडून नव्याने बांधण्यात आले.
स्थानिक लोकांच्या सहकार्याने आणि मदतीमुळे डॉन बॉस्को चे माजी मुख्याध्यापक फादर लिनो लोपेझ यांच्या देखरेखीखाली कमीतकमी वेळात नवे आकर्षक ‘ चॅपेल ‘ उभारण्यात आले.या सोहोळ्याला फादर क्लाइव्ह टेलिस, मथायस डिकुन्हा , जॉर्ज विलीयमस्, रॉबी फर्नांडिस, बरनारडीनो डी अल्मेडा,जिल्ह्यातील अन्य फादर, सिस्टर,क्रिश्चन समाजबांधव ,स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.