कुडाळ /-
कुडाळ तालुका व्यापारी संघटनेला यश..कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्षांनी निवेदन देताच सन्मा.पालकमंत्री उदय सामंत यांनी MSEB च्या अधिकाऱ्यांना फोन लावून कुणाच्याही घरी विज तोडायला गेलात तर गाठ माझ्याशी आहे असे कडक शब्दात आज कुडाळ येथे ठणकावले आहे.वाढीव व अवास्तव वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन कट करणार असल्याचे mseb ने सांगितले होते. तशा नोटिसा बजावल्या होत्या तसेच अन्यायकारक वीजबिल वसुली सुरू केली होती.त्याबाबत पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांची आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघटना यांनी कुडाळ येथे भेट घेतली.आणि
वीज बिल भरण्यास आम्ही तयार आहोत, परंतु त्यासाठी हप्ते द्या,हप्त्याने वीजबिल भरण्यास तयार आहोत. कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन कट करता कामा नये. त्याबाबत तत्काळ संबंधीत अधिकाऱ्यांशी पालकमंत्री श्री. उदयजी सामंत यांनी मोबाईल द्वारे संबंधित अधिकार्यांना सुचना केल्या व त्यांना सांगितले की हप्ते करून वीजबिले भरून घ्या.तसेच कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन कट करता कामा नये तसेच कोरोना कालावधीतील 6 महिन्याचे वीजबिल माफ करा असे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यांच्यावतीने आज कुडाळ येथे पालकमंत्री याना निवेदन देण्यात आले.