कुडाळ /-
सकल मराठा समाज कुडाळच्या शिवजयंती उत्सव 2021 निमित्त आयोजित केलेल्या तिसर्या भव्य जिल्हास्तरीय शिवचरित्रावर आधारित चित्ररथ स्पर्धेत श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ कुडाळने सादर केलेल्या चित्ररथाचा प्रथम क्रमांक आला तर दुसरा क्रमांक जयभावनी मित्र मंडळ नारूर यांनी पटकावला मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.
सकल मराठा समाज कुडाळच्या वतीने गेली तीन वर्ष शिवचरित्रावर आधारित भव्य चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा आयोजित केलेल्या चित्ररथ स्पर्धेचा शुभारंभ नगरसेविका व भाजपा महिला मोर्चा प्रमुख संध्या तेरसे व पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते झाला. यावेळी अखिल भारतीय मराठी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष सुंदर सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, नगरसेवक सचिन काळप, नगरसेविका अश्विनी गावडे, अदिती सावंत, श्रुती परब, जग्गू कुडाळकर, सुबोध परब, राजवीर पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचे सावट वाढत असल्यामुळे अनेक नियमांचे पालन करून ही चित्ररथ स्पर्धा यंदाही खंड न पाडता सकल मराठा समाज कुडाळने आयोजित केली. या वेळी जय भवानी जय शिवाजी च्या नामघोषात संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. या स्पर्धेत तृतीय क्रमांक तृतीय लिंगेश्वर मित्र मंडळ मुळदे यांचा आला. जलवा ग्रुप कुडाळ संघालाही गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण नाट्य दिग्दर्शक केदार देसाई व चित्रकार रजनीकांत कदम यांनी केले. विजेत्या संघांना रोख रक्कमेचे पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, यशस्वी मराठा उद्योजक सपना गावकर व किरण गावकर या दांपत्याच्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेच्या सुरूवातीला वेतोरे येथील सिंधुरत्न ढोल ताशा पथकाने ढोलताश्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बादल चौधरी व केदार राऊळ यांनी केले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व
रंगमंच नियोजन अभी गावडे, सचिन सावंत, बंटी राऊळ, शैलेश घोगळे, वैभव जाधव, एस. महाडदेव यांनी केले.