सिंधुदुर्ग/ –

रामराज्या प्रमाणे आदर्श अशा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, हिंदु युवक-युवतीमधील शौर्य जागृत करणे, जीवनातील साधनेचे महत्व आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी सिंधुदुर्ग येथील युवा धर्मप्रेमींसाठी रविवार, १४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते.

*चित्रपटसृष्टीतील आदर्श नकोत तर क्रांतिकारकांचे आदर्श ठेवूया ! – कु. पुजा धुरी*
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेताच डोळ्यासमोर अथांग महासागराचे चित्र डोळ्यासमोर येते, थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव कानावर पडताच अटकेपार भगवे ध्वज फडकतानाचे चित्र डोळ्यासमोर येते, देवी-देवतांनी शौर्यानेच असुरांचा वध केला. एवढा शौर्याने ओतप्रोत भरलेला आपला इतिहास आहे. असा शौर्यशाली इतिहास ज्यांनी घडवला अशा क्रांतिकारकांचा, विरागणांचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवूया, आपल्यामध्ये धाडस निर्माण करूया, असे आवाहन कु. पूजा धुरी यांनी शौर्य जागृती व्याख्यानात बोलताना केले.
कु. पूजा धुरी पुढे म्हणाल्या, युवतींनी स्वतःमधील शौर्य जागृत केलं तरच स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतात. लव्ह जिहाद, बलात्काराच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. इच्छा नसतानासुद्धा या घटना आपल्याला नियमितपणे वाचाव्या लागत आहेत. सर्व युवक युवतींनी या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःमधील देवीतत्व जागृत करूया.
तसेच आपले पालक २४ तास आपल्यासॊबत राहू शकत नाहीत. २४ तास आपल्यासोबत असतो आत्मविश्वास आणि भगवंत. या आत्मविश्वासाने आणि भगवंताच्या भक्तीने, शौर्याने आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊया, यासाठीच आपण या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊया, असे आवाहनही केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नयन पांगम यांनी केले. शौर्य जागृती व्याख्यानाचा उद्देश कु. राखी पांगम यांनी स्पष्ट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page