कुडाळ /-

कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरातील बसस्थानक १९७१ साली बांधले असून त्याचे वेगळे महत्त्व आहे. या शहरात येणार प्रवासी हा ग्रामीण भागातील आहे. २०१७ पासून आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. त्यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे हे बसस्थानक मार्गी लागले. वैभव नाईकांनी जबाबदारी घेत हे काम पूर्ण केले. आता ज्या सुविधा लागतील त्या सर्व लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा कोरोना संकटामुळे लांबला होता. अखेर आज हा सोहळा झाला. लालपरीचा जनसंपर्क पुन्हा एकदा ग्रामीण भागाशी निश्चितच होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कुडाळ बसस्थानकाच्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी केले. परब यांनी मुंबईतून मंत्रालयातून हे उद्घाटन केले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, या बसस्थानकाची काही कामे प्रलंबित होती म्हणून हि लोकार्पण सोहळा लांबला होता. हि कामे पूर्ण झालीत. ७०% बस सुरू झाल्या आहेत. लवकरच मुंबईत पाठवलेले कर्मचारी आल्या नंतर १०० % बस.धावतील. यावेळी त्यांनी मंत्री फरब यांच्या कडे त्या कर्मचाऱ्यांना त्वरित माघारी पाठवा अशी मागणी केली. जिल्ह्यातील मालवणसह इतर बसस्थानकांचे नुतनीकरण करण्यात येईल. कार्यक्रमाची प्रस्तावना विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, उपसभापती जयभारत पालव, काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष सुनील भोगटे, नगरसेवक सचिन काळप ,रुपेश पावसकर,राजू गवंडे,बाळा पावसकर,कट्टर शिवसैनिक रमेश हरमलकर ,पावशी सरपंच बाळा कोरगावकर,उपसरपंच दीपक आंगणे,उपाध्यक्ष अनंत पिळणकर ,राष्ट्रवादी काँग्रेस सचिव काका कुडाळकर,शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, राजन नाईक, संजय भोगटे, कुडाळ आगारप्रमुख सुजित डोंगरे, उपविभाग नियंत्रक गोसावी, विद्युत अभियंता प्रकाश नेरुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी भोई आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page