कुडाळ /-
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निवती रस्त्याचे बंद आवस्तेतील काम सुरू करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा ईशारा निवती येथिल ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाला भेट देत २१ डिसेंबर रोजी कुडाळ येथील मुख्य कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील यांना निवती ग्रामस्थांनी निवेदन देत काम बंद असलेल्या रस्त्या संदर्भात चर्चा केली होती.मात्र या चर्चे दरम्यान कोणतेही काम संबधीत ठेकेदाराने सुरू नकेल्याने मंगळवार दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी निवती ग्रामस्थ हे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ येथील जिल्हा ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहेत, या उपोषणाला किशोर सारंग ,तृप्ती कांबळी ,विलास आरोलकर, लक्षुमन नाईक,उदय सारंग ,सुरेश पडते ,कांचन पाटकर,अनिल मेतर ,वीरश्री मेंतर ,निलेश मस्त,नागेश सारंग ,भरती धुरी,अजित खवणेकर ,सुधीर मेतर ,रामचंद्र भगत ,नमिता घाटवळ हे सर्व निवती ग्रामस्थ उद्याच्या उपोषणाला सहभाग घेणार आहेत अशी माहिती निवती,ग्रामस्थ यांनी दिली आहे.