हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार आणि मुलगी घरातून गायब झाल्याने बापाने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
लखनऊ : हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार दिल्याने तसेच मुलगी घरातून गायब झाल्याने बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. हा प्रकार उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील नया पुरवा गावात घडला. दरम्यान या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या वडीलाचे नाव राम निषाद असे आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातमधील फतेहपूर जिल्ह्यामधील 45 वर्षीय राम सुफल निषाद यांच्या मुलीच्या लग्नाची वरात 6 डिसेंबर रोजी येणार होती. मात्र, हुंडा न दिल्यामुळे नवऱ्यामुलाने तसेच त्याच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर लग्न मोडल्यामुळे राम निषाद यांची मुलगी मला घरातून निघून गेली. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने राम निषाद यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
वडिलांनी केली होती तक्रार
नवऱ्या मुलाच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर मुलीचे वडील राम निषाद यांनी पोलिसांत तक्रार केली होती. हा सर्व प्रकार नेमका काय आहे याचा पोलीस तपास करत होते. याच दरम्यान, ज्या मुलीचे लग्न होणार होते ती घरातून संदिग्ध अवस्थेत गायब झाली. त्यांनतर मुलगी घरी न आल्याचे समजताच राम निषाद यांनी गळफास लावत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.
लग्नास नकार दिल्याने वडील नाराज
“माझ्या बहिणीचे हमीरपूर येथील छैदू यांच्याशी लग्न ठरले होते. मात्र, छैदू यांच्या कुटुंबीयांनी ऐनवेळी लग्नास नकार दिला. याच कराणामुळे माझे वडील नेहमी दु:खी असायचे. त्यात 16 डिसेंबरला माझी बहीण गावाशेजारील जंगलातून गायब झाली. रात्री, उशिरापर्यंत ती घरी न आल्यामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली,” असे मृत राम निषाद यांच्या दुसऱ्या मुलीने सांगितले.
या घटनेबाबत अधिकचा माहिती देताना एसपी सतपाल अंतिल यांनी सांगितलं पुरवा गावात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर राम सुफल निषाद यांनी आत्महत्या केल्याचं समजलं. निषाद यांना एकूण सात मुली असून तीन मुलं आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.