कुडाळ /-
कुडाळ पोलीस स्थानकाला गेल्या दोन तीन वर्षात प्रभारी अधिकाऱ्यांना थेट नियंत्रण कक्षात नेण्याचे अनेक प्रकार घडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हा विषय चर्चेचा ठरला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांना नियंत्रण कक्षात नेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
कुडाळ पोलीस स्थानकात हजार झालेले व यापूर्वी या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काम केलेले व सर्वांशीच जवळचे संबंध असलेले जगदीश काकडे यांना तत्कालीन पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी काही महिन्यातच नियंत्रण कक्षात नेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना तब्बल तीन वेळा नियंत्रण कक्ष दाखवण्यात आला व परत कुडाळला पाठवण्यात आले. कुडाळ पोलीस ठाण्यातील इतरही काही कर्मचाऱ्यांना मुख्यालयात नेऊन परत कुडाळला आणण्यात आले. त्यामुळे आता नवीनच रुजू झालेले पोलीस अधीक्षक याबाबत कोणती कार्यप्रणाली वापरतात हे पाहावे लागणार आहे.