मातृत्व आधार फाऊंडेशन ” संस्थेच्या वतीने कर्तव्य दक्ष तहसीलदार श्री. अजय पाटणे यांचा सत्कार…

मातृत्व आधार फाऊंडेशन ” संस्थेच्या वतीने कर्तव्य दक्ष तहसीलदार श्री. अजय पाटणे यांचा सत्कार…

मालवण /-

मालवण तालुक्यात गेली अडीच वर्षे कर्तव्य दक्ष तहसीलदार म्हणून सेवा बजावणारे मा. श्री. अजय पाटणे साहेब यांची पेण येथे बदली झाली आहे.
त्या निमित्ताने त्यांनी मालवण वासियांना कोरोनाच्या महामारीत चांगली सेवा देण्याचे केलेले काम कौतुकास्पद होते.
याची दखल घेऊन मालवण येथील “मातृत्व आधार फाऊंडेशन ” या सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण, संस्थापक श्री. संतोष लुडबे, श्री. महेश बागवे, संचालक श्री. विश्वास गावकर, श्री. प्रफुल्ल देसाई पत्रकार,श्री संतोष चव्हाण, श्री. पंकज पेडणेकर,श्री. सुबोध गांवकर, श्री. संदीप नेवाळकर, श्री. अक्षय सातार्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..