▪️विदयुत महामंडळ अधिक्षक अभियंता यांना लेखी निवेदन देत दिला ईशार

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ

कंत्राटी कामगार धनंजय फाले यांच्या अपघाती मृत्युस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि फाले यांना नुकसान भरपाई मिळावी यासंदर्भात आज कुडाळ येथे झालेल्या महत्वूर्ण बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना आणि
कुडाळ विकास समितीत आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत उपोषणाचा ईशारा आज कुडाळ येथे दिला आहे.त्याबाबतचे लेखी निवेदन विदयुत महामंडळ अधिक्षक अभियंता यांना दिले आहे.

कंत्राटी कामगार धनंजय फाले यांचा अपघाती मृत्यु झाला,या अपघातात जबाबदार विदयुत महामंडळाचे कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर अपघाताची जबाबदारी ठरवून कारवाई केली आहे का? नसल्यास किती दिवसात कारवाई करणार याची माहिती देण्यात यावी.तसेच अपघात ग्रस्थ फाले याला शासकीय व कंत्राटदाराकडुन होणाऱ्या मदतीचा अधिकृत तपशिल देण्यात यावा व होणारी आर्थिक मदत दहा दिवसात वारसांना न मिळाल्यास व जबाबदार व्यंक्तीनवर कारवाई न झाल्यास सोमवार दि 04/09/2023 रोजी आपल्या कार्यालयासमोर कुडाळ विकास समिती, सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना महादेवाचे केरवडे ग्रामस्थ व पिंगुळी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळ,अधिक्षक अभियंता यांना लेखी निवेदन देत.आज आमरण उपोषणास बसणार असे लेखी निवेदन देत ईशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page