✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
मूळ हिंदुस्थानचा ढाचा हा बारा बलुतेदार संस्कृती वरती उभा असून याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.त्यामध्ये सुतार, नाभिक, सोनार, लोहार, कुंभार, चर्मकार यासारख्या पारंपारिक कौशल्य असलेल्या सर्व कारागीर आहेत.त्यामध्ये नाभिक समाजाचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा अध्यक्ष श्री जगदीश चव्हाण यांची निवड राज्यातील चार प्रतिनिधीतील एक म्हणून करण्यात आलेली आहे.
