✍🏼लोकसंवाद /- बांदा.
गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ५० हजाराच्या दारूसह ६ लाख ४२ हजाराची गाडी असा मिळून १३ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी इन्सुली खांबदेव नाका परिसरात करण्यात आली. विजय रमाकांत माने रा.नेरूर ता. कुडाळ, असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. कागदी पुठ्ठ्याच्या आत लपवून दारू वाहतूक केली जात होती.
