✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
कणकवलीतील स्थानिक व्यापाऱ्यांची आमदार नितेश राणे यांच्याजवळ तक्रार करताच क्षणी कणकवलीतील तो, बिग सेल आखेर बंद झाला.कोल्हापूर गांधीनगर येथील व्यापाऱ्याने अरविंद साडी सेंटरच्या नावाने लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात सुरू केलेल्या सेल मुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची कैफियत आमदार नितेश राणेंकडे कणकवलीतील व्यापाऱ्यांनी मांडली होती.राणे स्टाईल जे याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही व्यापाऱ्यांनी आमदार नितेश यांच्याकडे केली.हे कळताच राणे स्टाईल चा धसका घेत काही होण्यापूर्वीच कोल्हापूरातील त्या व्यापाऱ्याने आपला सेल बंद केला आहे.ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर साड्या, टॉवेल, उशी कव्हर, बेडशीट आदी साहित्याचा बिग सेल अरविंद साडी सेंटर च्या नावाने कोल्हापुरातील व्यापाऱ्याने सुरू केला होता.स्थानिक दुकानांपेक्षा स्वस्त दराने त्याच दर्जाची खरेदी करता येत असल्याने ग्राहकांची या सेल मध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती.त्याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसत होता.याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांनी आमदार नितेश राणेंकडे आपली कैफियत मांडली होती.आमदार नितेश राणेंकडे तक्रार झालीय हे समजताच सेल वाल्या व्यापाऱ्याने आपला सेल बंद केला असून सेल बंद असल्याची पाटी गेटवर समोर लावण्यात आली आहे.
