▪️वनविभाग अधिकारी, रिक्षाचालकांनी उपचारासाठी दाखल केले पशू दवाखान्यात..
✍🏼लोकसंवाद /- आंबोली.
फौजदारवाडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात आज सकाळी कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाला शिकारीसाठी घेरले होते. त्याचवेळी तेथून रिक्षा घेऊन जाताना जवळच घर असणाऱ्या रानमाणूस” प्रथमेश गावडे याला लक्षात आल्यानंतर त्याने त्या पिल्लाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले.त्याच्यासोबत मग शैलेश गावडे आणि राकेश अमृसकर हे देखील आले यानंतर त्यांनी आंबोली वन विभागाला कळवल्यानंतर बाळा गावडे आणि वनरक्षक श्री. गाडेकर यांनी त्या पिल्लाला आंबोली वनकार्यालयात नेले पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. हे पिल्लू साधारण अंदाजे वर्षभराचे आहे आईपासून बिलगले आणि कुत्र्यांनी पाण्यात त्याला घेरले. त्यामुळे आईची आणि पिल्लाची ताटातूट झाली.
