✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. यात माडखोल, सांगेली आणि इन्सुलीतील युवकांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तपासणी अमलदार सागर खंडागळे यांनी दिली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत त्या मुलीच्या आईसह अन्य दोघे, असे मिळून एकुण सहा जण संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबतची तक्रार संबंधित मुलीच्या वडिलांनी दिली होती. आपल्या अल्पवयीन मुलीला वाम मार्गाला लावण्यात आले आहे. त्यात काही युवकांसह आपली पत्नी जबाबदार आहे, अशी त्यांची तक्रार होती. त्यानुसार या प्रकरणी पहिल्या टप्प्यात दोघांना अटक करण्यात आली होते. ते दोघे आता न्यायालयीन कोठडीत आहेत तर आईला अटक झाल्यानंतर तिची जामीनदार मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान काल रात्री उशिरा सावंतवाडी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. यात पायबा गावडे (रा. माडखोल, वय ३६), संदीप गावडे (रा. सांगेली, वय ३६) व ज्ञानेश्वर मोरजकर (रा. इन्सुली, वय २५) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे श्री. खंडागळे यांनी सांगितले.
