✍🏼लोकसंवाद /- मालवण.

मालवण तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या शेत विहीरीत गवा रेडा पडल्याचे निदर्शनास आले आहे.याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.आज सकाळी या परिसरात चार कापण्यासाठी आलेल्या समिर पालव यांना हा गवारेडा दिसून आला.याबाबत माहिती पोलीस पाटील विरेन कदम यांनी वन अधिकाऱ्यांना दिली आहे. गवारेड्याला विहिरीतून बाहेर काढण्याबाबत कार्यवाही केली जात आहे.डोंगर भागात झाडे आणि वेली यांनी ही विहीर आच्छादलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page