✍🏼लोकसंवाद /- बांदा.

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना कोलगाव येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ५ लाखांच्या दारूसह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणपत प्रभाकर माईणकर (रा. कोलगाव चाफेली, वय २८) असे त्या युवकाचे नाव आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आरोसबाग फाट्यावर मुंबई-गोवा महामार्गावर केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून सिंधुदुर्गात बेकायदा दारु वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार बांदा पत्रादेवी रोडवर = आरोसबाग फाट्यावर पथकाने सापळा रचला होता. गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एमएच ०६ एएफ २४४८) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये तब्बल ८५ दारुचे बॉक्स आढळून आले. विदेशी ब्रँडच्या ७५० मिलीच्या ९०० बाटल्या व १८० मिलीच्या ४८० बाटल्या जप्त करण्यात आल्या. ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांची दारु व ६ लाख २५ हजारांची कार असा एकूण ११ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशावरुन निरीक्षक पंकज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, कॉस्टेबल विलास पवार, सुशांत बनसोडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page