✍🏼लोकसंवाद /- मालवण.

मालवण येथील अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि अंगणवाडी कर्मचारी यांना सरकारी नोकरीत कायम करावे,या प्रमुख मागणीसाठी दि. २५ जुलै रोजी दुपारी १ वा. बालविकास प्रकल्प अधिकारी,मालवण यांच्या कार्यालयावर छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मालवण येथील अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने बालविकास प्रकल्प अधिकारी मालवण व मालवण पोलीस ठाणेच्या उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांना देण्यात आले आहे. यावेळी विशाखा कुबल, नम्रता भगत, मधुरा रांगणेकर आदी उपस्थित होते. या छत्री मोर्चा दरम्यान प्रकल्प कार्यालयात जमल्यानंतर घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे, अशी माहिती निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page