✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्ताने आज डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अतंर्गत गोड्यापाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जयगड़ येथील “जिंदाल स्टील” संस्थेला शोभिवंत मत्स्यबीज वितरीत करण्यात आले.

देशात प्रतिवर्षी १०जुलै हा दिवस राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो, या दिनाचे औचित्यसाधूनहा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मत्स्यप्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितिन सावंत व सहकारी डॉ. मनोज घुघूसकर, कृपेश सावंत आणि जिंदाल स्टील प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने व्यक्तिगत वृद्धिगत होत आहे. शेतकऱ्याच्या घराजवळ उपलब्ध जागेचा चांगल्या प्रकारे वापर करून स्वयंरोजगाराचे साधन म्हणून शोभिवंत मत्स्यपालन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दगदगीच्या जीवनशैलीत वाढणाऱ्या ताण-तणावाला कमी करण्याचे काम शोभिवंत मत्स्यपालन पेट्या करत असतात. शेतकऱ्यांनी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून असे व्यवसाय करणे आवश्यक आहे अशी माहिती यावेळी मत्स्यविभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन सावंत यांनी दिली. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय भावे आणि विस्तार शिक्षण संचालक डाॅ. प्रमोद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page