✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
वेंगुर्ला तालुक्यातील खानोली ,वायंगणी, मातोंड व पेंडूर या चार ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रभागनिहाय जाहीर झालेले आरक्षण खालीलप्रमाणे :
1.’ग्रामपंचायत खानोली’ : एकूण सदस्य संख्या 7, प्रभाग 1 घोगळवाडी, देऊळवाडी, पश्चिम देऊळवाडा, सावंतवाडा, धनगरवाडी यासाठी सदस्य संख्या 3 असून येथे सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग 2 कातर्र्णीचे भाटले, घोलेकरवाडी, हरिजनवाडी देऊळवाडी पूर्व सदस्य संख्या 2 असून येथे ना.मा.प्र. व सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण आहे. प्रभाग 3 आंबेस्वाडी सदस्य संख्या 2 असून येथे सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
2 ‘मातोंड ग्रामपंचायत’: एकूण सदस्य संख्या 9, प्रभाग 1 सावंतवाडा भरभरेवाडी, गंडाची राई खालचे बांबर, मधलावाडा तळेवाडी या भागासाठी सदस्य संख्या 3 असून येथे सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग 2 वरचे बांबर, न्हावीवाडी, नाटेली, हरिजनवाडी गावठण या भागासाठी सदस्य संख्या 3 असून येथे ना.मा.प्र., सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग 3 मडवाडी, गोवळवाडी, बामणाचे टेंब, सुकळीवाडी, मिरिस्तेवाडी, काजीरमळा या भागासाठी सदस्य संख्या 3 असून अनुसूचित जाती स्त्री, ना.मा.प्र. स्त्री. व सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
3’ग्रामपंचायत् वायंगणी : एकूण सदस्य संख्या 9, प्रभाग 1 बागायतवाडी, कांबळीवाडी, साळगावकरवाडी हुलमेखवाडी, नांदोस्करवाडी, पोयंडीवाडी, डोंबवाडी, कोचरेकरवाडी सदस्य संख्या 3 असून येथे ना.मा. प्र.स्त्री., सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग 2 नाईकवाडी, कामतवाडी, धोंडवाडी, पंडितवाडी,नांदरुखवाडी, कोंडुसवाडी सदस्य संख्या 3 असून येथे ना.मा.प्र., सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग 3 मोरवावाडी, आवेरानिवतीवाडी, सुरंगपाणी, आवेरा सावंतवाडा, आवेरा सातारडेकरवाडी, आवेरा नाईकधोंडवाडी, आवेरा धनगरवाडी तळेवाडी या भागासाठी सदस्य संख्या 3 असून सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
4 ‘ग्रामपंचायत पेंडूर’ : एकूण सदस्य संख्या 9, प्रभाग 1 नेवाळेवाडी, सातवायंगणी सदस्य संख्या 3 असून येथे सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग 2 दुकानवाडी नाईकवाडी सदस्य संख्या 3 असून ना.मा. प्र.स्त्री., सर्वसाधारण स्त्री सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग 3 पेंढऱ्याचीवाडी, खुळादेववाडी सदस्य संख्या 3 असून येथे ना.मा.प्र. सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे प्रभाग निहाय आरक्षण आहे.
