✍🏼लोकसंवाद /-
मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस नदी पुलावरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये 15 प्रवाशांची दुर्दैवी मृत्यू झाला. तर 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावर स्थानिक आणि पोलिसांडून बचावकार्य करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात खरगोनहून इंदूरला जाणारी प्रवासी बसला मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस पुलाचा संरक्षण कठडा तोडून नदी कोसळली. 50 फूट उंच पुलावरुन ही बस नदीमध्ये कोसळली. ऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दसंगा पुलावर हा अपघात झाला. या अपघातात बसमधील 15 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत.