✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि.6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 6 मे रोजी सायं.5 वाजता आंबोली येथे आगमन व आंबोली येथे कुलगुरु, मुंबई विद्यापीठ व संबंधित अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसिलदार, पोलीस अधिकारी व सरपंच, आंबोली ग्रामपंचायत यांच्यासमवेत शैक्षणिक संकुलाची पहाणी. सोईनुसार, कावळेसाद येथे पहाणी. सोईनुसार, कावळेसाद येथून मोटारीने माठेवाडा, सावंतवाडीकडे प्रयाण. सोईनुसार, हाजरत जंगली पीर शा बाबा उरुस माठेवाडा, सावंतवाडी येथे उपस्थिती.सोईनुसार, माठेवाडा, सावंतवाडी येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतवाडीकडे प्रयाण. सोईनुसार, शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page