✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

इयत्ता आठवीतील कुमार राजाराम विलास राऊळ या विद्यार्थ्याचे घर शॉर्ट सर्किटने जळले . घरातील धान्य, कागदपत्र , महत्त्वाचे सर्व साहित्य जळून खाक झाले . कुमार राजाराम विलास राऊळ याच्या कुटुंबावर संकट ओढवले हे लक्षात घेता . संस्था आणि मुख्याध्यापक यांच्यातर्फे मुलांना शिक्षकांना मदतीचे आवाहन करण्यात आले.

अगदी गरीब परिस्थिती असताना शालेय जीवनात ओढवलेले हे संकट पाहता धीर देण्याकरिता आपल्या खाऊ साठी दिलेल्या पैशातून पस्तीस हजार रक्कम जमा करून देण्यात आली . याप्रसंगी संस्थाचालक श्री सुधीर ठाकूर यांनी सांगितले की दुसऱ्याचे दुःख जाणण्यासाठी आपली संवेदनशीलता जागृत पाहिजे आणि असा प्रसंग कोणावर कधी ओढवेल हे सांगता येत नाही . त्यामुळे ही मदत म्हणजे या संकटातील खारीचा वाटा आहे. ही मदत त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करत आहोत याप्रसंगी पर्यवेक्षक श्री हंजनकर सर संस्थाचालक श्री देवदत्त साळगावकर श्री सुभाष चौधरी शिक्षक प्रतिनिधी केरकर सर श्री बोंदर सर श्री विलास राऊळ उपस्थित होते आभार श्री संदीप साळसकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page