▪️स्थानिक नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरीकांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
      
कुडाळ शहरातील डाॅ. आंबेडकर नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरीकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विजयकुमार जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सर्वांनी पुजापाठ केला. व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी लक्ष्मण कुडाळकर, आत्माराम जाधव, सुशीला कुडाळकर, पांडुरंग कुडाळकर, नगरसेवक विलास कुडाळकर, माजी नगरसेविका सरोज जाधव, रजनिकांत कदम, नितेश कुडाळकर तसेच डॉ. आंबेडकर नगरातील इतर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    
तसेच यावेळी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी कार्यालयाचे माजी अधिकारी मनोहर आंबेकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू , सिंधुदुर्ग शिक्षक समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर अणावकर, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक शिंदे, भारतीय बौद्ध महासभेचे सचिव प्रभाकर जाधव, निलेश तेंडुलकर यांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page