वनविभागाने उपद्रवी माकडाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास शिरोडा भाजप कडून आंदोलनाचा इशारा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

एक महिन्या पूर्वी पासून गावातील महिला , वयोवृध्द , लहान मुले याना त्रास सहन करावा लागत असून आज सोमवार रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्याने सगुण शंकर नाईक वय 60 वर्षे हे घर च्या परिसरात वावरत असताना माकडाने अचानक धावत येऊन त्यांच्या पायाचा चावा घेतल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्काळ उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे दाखल केले असता सात टाके घालून उपचार करण्यात आले.बातमी समजताच शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर व माजी उपसरपंच राहुल गावडे यांनी खाजन भाटी वाडीत जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.या पूर्वी सदर माकडाने कीर्ती आमरे , मिलन आमरे , कु. प्रिन्स आमरे यांच्या वर अचानक हल्ला चढवून त्यांना जखमी केले होते , तसेच बऱ्याच महिलां चा पाठलाग करून उपद्रव केला होता.

माकडाच्या या उपद्रवा मुळे स्थानिक रहिवाशां मध्ये दहशतीचे वातावरण असून शाळेत जाणाऱ्या मुलां मध्ये , तसेच काजू तोडणी साठी जाणाऱ्या लोकांमध्ये व महिलांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.अशी माहिती माजी ग्रा पं सदस्या सौ प्राची नाईक व प्रकाश आमरे यांनी दिली आहे.स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी वरून वनविभागा च्या अधिकाऱ्यांनी कडून पाहणी झाली असून त्यांना अद्याप सदर माकड पकडण्यात अपयश आलेले आहे.सदर माकडाला त्वरित पकडून ग्रामस्थां मधील भीतीचे वातावरण लवकरात लवकर दूर करावे अशी मागणी मनोज उगवेकर व राहुल गावडे यांनी वनविभागा कडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page