✍🏼लोकसंवाद/-कुडाळ अमिता मठकर

सुशीला शिशुवाटीका, हिंदू कॉलनी, कुडाळ आयोजित विष्णु शिशु मेळावा आयोजन केले आहे.भारतीय पध्दतीच्या शिक्षणाचा सिंधुदुर्गात सुरु असलेला प्रयोग पाहण्याची सुवर्ण संधी शैक्षणिक प्रगती म्हणजे केवळ बौध्दिक विकास नव्हे, केवळ लेखन, वाचन नव्हे, पूर्व प्राथमिक शिक्षणात प्रयोगशाळा, स्वयंपाकघर, चित्रशाळा, कलाशाळा, कार्यशाळा, रंगमंच, बाग, प्रदर्शनी, तरण तलाव, प्राणी संग्रहालय, वस्तू संग्रहालय, क्रीडांगण आदींचा वापर करुन पूर्व प्राथमिक शिक्षण दिल्यास सर्व अंगांनी शैक्षणिक विकास कसा होईल हे समजून घेण्यासाठी जरुर भेट द्या.शिशु मेळावा, दिनांक १२ मार्च रविवारी दुपारी २ ते ५ वेळेत आयोजित केले आहे. कुडाळ स्थान : सुशीला शिशुवाटीका, हिंदु कॉलनी, कुडाळ अपेक्षित शिशु शिक्षण संबंधी आवड असलेले पालक व शिशु सर्वांचे स्वागत आहे.असे आवाहन श्रीमती विजय रामाणे शिशुवाटिका प्रमुख ,डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई अध्यक्ष विद्याभारती, सिंधुदुर्ग ,श्री. श्रीधर गोरे ९४०३४०३९६० ,सौ. योगिता कवटणकर ८६९८०७११८५ ,सौ. कविता कुंटे. यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page