✍🏼लोकसंवाद /- सिंधदुर्ग.

शिवसेना पालघर लोकसभा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख पदी आमदार रविंद्र फाटक यांची निवड शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अभेद्य ठेवण्यासाठी पुढील काळात काम केलं जाईल. सत्तेच्या माध्यमातून कोकणात सर्वांगीण विकास साधला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना उभारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया श्री. फाटक यांनी दिली आहे.श्री. फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांचा कोकणात दांडगा लोकसंपर्क आहे. अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले नेटवर्क उभे केकेलं आहे. त्याचा उपयोग करून आगामी काळात शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांच्यावर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही निवड जाहीर होताच झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री संजय आंग्रे त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, वेंगुर्ला तालुका प्रमुख श्री नितीन मांजरेकर, माझी सभापती श्री संदेश पटेल सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नितीन शिरोडकर, सरपंच संघटना तालुका दोडामार्ग अध्यक्ष श्री प्रवीण गवस यांनी त्यांचे भेटून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page