✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार श्री. हजारे व तलाठी श्री. राठोड या शासकीय कर्मचा-यांना ते शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणलेप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकुर, अमोल ठाकुर, अंकीत नाईक, स्नेहांकीत बांदेकर, वैभव देसाई जागृत परब, साईराज अणावकर, संतोष मठकर, बिनयकुमार सिंग, संदीपकुमार सिंग आदी 11 आरोपींची ओरास- सिंधुदुर्ग येथील मे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. जे. भारुका यांनी प्रत्येकी रक्कम रु.15000/- च्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. प्रस्तुत आरोपीतर्फे अॅड. संग्राम देसाई, अॅड. सुहास सावंत, अॅड. अविनाश परब, अॅड. यतिश खानोलकर, अॅड. चैतन्य परब, अॅड. सुशांत घाडीगावकर यांनी काम पाहीले..
प्रस्तुतची घटना दिनांक 01/02/2023 रोजी रात्रौ 11.00 वाजताचे सुमारास मालवण-कुडाळ हमरस्त्यावर कुडाळ केळबाईवाडी – स्मशानभुमी येथे घडली होती. यातील फिर्यादी तलाठी श्री. राठोड व नायब तहसिलदार श्री. हजारे बेकायदेशीर वाळु उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करणेचे उददेशाने प्रस्तुत वेळी गस्त घालीत असताना त्यांनी कुडाळ केळबाईवाडी स्मशानभुमिकडे यातील आरोपी संतोष मठकर बिनयकुमार सिंग, संदीपकुमार सिंग व अन्य एक आरोपी घेउन जात असलेले चार वाळुचे डंपर कारवाई करणेकरीता थांबविले व त्यांचेवर अनधिकृत वाळु वाहतुकीसंदर्भात कारवाई करणेस सुरुवात केली. त्यावेळी यातील आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकुर, अमोल ठाकुर, अंकीत नाईक, स्नेहांकीत बांदेकर वैभव देसाई, जागृत परब साईराज अणावकर हे चारचाकी व दुचाकी गाडी घेउन सदर ठिकाणी आले व या सर्वानी एकत्रित जमाव करुन फिर्यादी श्री. राठोड व नायब तहसिलदार श्री. हजारे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन फिर्यादी यांचा मोबाईल काढुन घेतला तसेच त्यांचे हातातील जप्तीनामा काढुन घेउन त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना त्यांचे नियमीत शासकीय कर्तव्य पार पाडणेपासुन अटकाव केला अशा आशयाची तक्रार फिर्यादी यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिलेली होती.
त्यानुसार प्रस्तुत,आरोपीविरुदध,भा.द.वि.कलम 353,332,327,379,143,144, 147, 148, 149, 323, 504, 506,352 सह महाराष्ट्र पोलीस
अधिनीयम कलम 37 (1) व खाण व खनिज अधिनीयम चे कलम 21 प्रमाणे दिनांक 02/02/2023 रोजी तक्रार दाखल झालेली होती.
प्रस्तुत गुन्हयाचे कामी अक्षय वालावलकर गौरव ठाकुर, अमोल ठाकुर, अंकीत नाईक स्नेहांकीत बांदेकर, वैभव देसाई, जागृत परब यांना दिनांक 04/02/2023 रोजी अटक झालेली होती व त्यांना कुडाळ न्यायालयाने दिनांक 08/02/2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावणेत आलेली होती. दिनांक 08/02/2023 रोजी कुडाळ न्यायालयाने प्रस्तुत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती. तर यातील आरोपी साईराज अणावकर संतोष मठकर बिनयकुमार सिंग, संदीपकुमार सिंग यांना दिनांक 13/02/2023 रोजी अटक झालेली होती व त्यांना दिनांक 13/02/ 2023 रोजी कुडाळ न्यायालयात हजर केले असता कुडाळ न्यायालयाने त्यांना प्रस्तुत दिवशीच न्यायालयीन कोठडी सुनावणेचे आदेश दिलेले होते.
याप्रकरणी आरोपींनी जामिन मिळणेकरीता मे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज ,दाखल केलेनंतर त्यावर सुनावणी होडुन प्रस्ततुचे अर्ज मंजुर होउन न्यायालयाने सर्व आरोपींची सशर्त जामिनावर मुक्तता केली.