✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

भंडारी क्रिकेट स्पर्धा म्हणजे भंडारी समाजातील युवकांची समाज बांधणी करून युवकांना प्रोत्साहन देणारी आहे. समाजातील युवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपण खेळ वृद्धिंगत करावा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाचे अध्यक्ष श्री रमण वायंगणकर यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले आयोजित क्रिकेट स्पर्धा वेंगुर्ला भंडारी चषक २०२३ चे वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अँड.श्याम गोडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले उद्घाटन करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर,सचिव विकास वैद्य, डाॅ.आनंद बांदेकर,जयराम वायंगणकर,आनंद केसरकर,माजी गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर,विलास मांजरेकर,सौ.श्रेया मांजरेकर,गजानन गोलतकर,दिपक कोचरेकर,राजू गवंडे,आळवे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रा.सचिन परूळेकर यांनी केले.

या क्रिकेट स्पर्धेत १८ संघानी भाग घेतला आहे.तर भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून ,वेंगुर्ला “भंडारी चषक २०२३ चा कोणता संघ जिंकणार याकडे लागले क्रिकेट प्रेमीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान यावेळी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देताना अँड. श्याम गोडकर म्हणाले की, ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे भंडारी समाजातील युवकांची समाज बांधणी करून युवकांना प्रोत्साहन देणारी आहे. समाजातील युवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपण खेळ वृद्धिंगत करावा.या स्पर्धेतून भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचा संघ तयार करावयाचा असून,सिंधुदुर्ग भंडारी महासंघाच्या दि.१४ व १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार असून, समाजातील खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.असे श्री गोडकर यांनी सांगितले.तर या स्पर्धेत १८ संघानी भाग घेतला ही स्पर्धा गुरुवार पर्यत दोन दिवस चालणार आहे.यावेळी आभार सत्यवान साटेलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page