✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
श्री देव भैरव उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यातर्फे वर्धापन दिन सोहळा सन २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त आज, सोमवार ६ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता भैरव मंदिर आणि मंदिराबाहेर ‘दीपोत्सव’ साजरा होणार आहे. तर मंगळवार, ७ फेब्रुवारी रोजी श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ- भैरववाडी येथे सायंकाळी ७ वाजता निमंत्रित डान्स, रात्री ९ वाजता ‘ढ’ मंडळी कुडाळ सादरकर्ते “बिलिमारो” आणि त्यानंतर वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ‘स्त्री वेषधारी गणेश’ हा नाट्यप्रयोग होईल.
तसेच बुधवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० लघुरुद्र, सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद, जिल्हास्तरीय केळीचे मखर स्पर्धा (बक्षिसे : प्रथम ७१५१ रु., द्वितीय ५१५१ रु., तृतीय ३१५१ रु., उत्तेजनार्थ प्रथम / द्वितीय १५५१ रु.,सहभागी स्पर्धकास प्रत्येकी ५०० रु.), सायंकाळी ६ वाजता प्राथमिक शिक्षक कलामंच-कुडाळ यांचे भजन, रात्री ८ वा. मखर स्पर्धेचे बक्षीस वितरण, रात्रौ ९ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा “कुर्मदासाची स्वारी” हा नाट्यप्रयोग होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव भैरव उत्सव मंडळ-कुडाळ यांनी केले आहे.